शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील पानपट्टीचालकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:57 IST

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पानपट्टीचालकांनी सहभाग घेतला. जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पानपट्टीचालक मोर्चाला गेले होते.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखूजन्य वस्तू व खाद्य वस्तू (पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस् आदी) एकाच ठिकाणी विकण्यास परवानगी देऊ नये, तसेच तंबाखूजन्य वस्तूंच्या ...

ठळक मुद्देखाद्य वस्तू विक्रीस परवानगी देण्याची मागणी जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाना प्रणाली लागू करावी,

कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पानपट्टीचालकांनी सहभाग घेतला. जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पानपट्टीचालक मोर्चाला गेले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखूजन्य वस्तू व खाद्य वस्तू (पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस् आदी) एकाच ठिकाणी विकण्यास परवानगी देऊ नये, तसेच तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाना प्रणाली लागू करावी, अशा लेखी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या. या सूचनेचा विपरित परिणाम शहरासह ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या दुकानदारांवर/किरकोळ विक्रेत्यांवर होणार आहे. शिवाय तंबाखूजन्य वस्तूच्या दुकानातून पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस्, चिप्स, कोल्ड्रिंग्ज आदी वस्तूंच्या विक्रीस प्रतिबंध केल्यास त्यांना केवळ तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंच्या विक्रीतून मिळणाºया उत्पन्नावर अवलंबून राहावे लागेल.

ते कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पुरेसे नाही, असे मत पानपट्टीचालकांचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सूचनेचा विचार करू नये, अशी मागणी पानपट्टीचालकांची आहे.दरम्यान, गुटखा बंदी करतेवेळी राज्यातील सर्व पानपट्टीधारकांनी याचे स्वागत केले. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पानपट्टीचालकांना गुटख्याच्या बदल्यात इतर वस्तू विक्रीला परवानगी देतो, असे सांगितले होते. कालांतराने सुगंधी तंबाखूवर सरकारने बंदी घातली. त्यातच आता खाद्य वस्तू पानपट्टीत विकण्यावर बंदी केली. त्यामुळे पानपट्टी व्यवसाय धोक्यात आला असल्याचे मत पानपट्टीचालकांनी व्यक्त केले. मोर्चासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाो शिंदे, विनायक घळसासी, उमेश ठोंबरे, वायचळ, आदी पानपट्टीचालक गेले होते.पानपट्टीचालक दृष्टिक्षेपात...(कोल्हापूर जिल्हा)  ५५०० -कोल्हापूर जिल्हा  ७५०-कोल्हापूर शहरमागण्या...१तंबाखू व तंबाखुजन्य वस्तू उत्पादन, वितरण साठा या संदर्भात केंद्र सरकारने बनविलेल्या ‘कोटपा’ कायद्याचा फेरविचार करावा२तंबाखू व तंबाखूजन्य वस्तू विक्रीच्या दुकानांत पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस्, चिप्स, कोल्ड्रिंग्ज आदी वस्तुंची विक्री करू नये, या केंद्र सरकारने केलेल्या सूचनेचा राज्य सरकारच्यावतीने विचार केला जाऊ नये.  ३तंबाखू वस्तू विक्रीसाठी परवाना असावा, परंतु स्वतंत्र परवाना असावा, अशी घातली जाणारी अट रद्द करण्यात यावी. 

पानपट्टीचालकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न मांडणार आहे. १ जानेवारी २०१८ पासून पानपट्टीत खाद्य वस्तूची विक्री करू नये, असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सर्व पानपट्टीचालक अखेरपर्यंत याप्रश्नी लढा देतील.-अरुण सावंत, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन.